अरेच्चा! चक्क चहा विक्रेत्याला बँकेने घोषित केले 50 कोटींचे डिफॉल्टर

हरियाणाच्या कुरूक्षेत्र येथे एक असा विचित्र प्रकार समोर आला आहे की जो समजल्यावर तुम्ही देखील हैराण व्हाल. येथे एका चहा विक्रेत्याला बँकेने तब्बल 50 कोटी रुपयांचे डिफॉल्टर घोषित केले आहे. मात्र चहा विक्रेते राजकुमार यांचे म्हणणे आहे की त्यांनी कधीही कर्ज घेतले नाही, तरीही त्यांना 50 कोटी रुपयांचे कर्जदार बनविण्यात आले आहे.

राजकुमार म्हणाले की, कोव्हिड-19 मुळे आर्थिक स्थिती खराब झाल्याने मी कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र बँकेने ही म्हणत अर्ज नाकारला की मी आधीपासूनच 50 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. माहित नाही हे कसे शक्य झाले.

राजकुमार कुरूक्षेत्रमध्ये चहाचे दुकान चालवतात. त्यांनी सांगितले की, याच कमाईद्वारे ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. कोरोना व्हायरस महामारीमुळे त्यांचा धंदा चालत नव्हता. ज्यामुळे त्यांना बँकेच्या कर्जाची गरज पडली. मात्र बँकेने त्यांना डिफॉल्टर असल्याचे सांगत अर्ज रद्द केला.