असे लॉक करा तुमचे फेसबुक प्रोफाईल, कोणीही करु शकणार नाही टाईमलाईनशी छेडछाड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने काही महिन्यांपुर्वी युजर्सचा खाजगी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रोफाईल लॉक फीचर लाँच केले होते. युजर्स या फीचरच्या मदतीने आपले प्रोफाईल लॉक करू शकतात. यामुळे त्यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ केवळ फ्रेंडलाच दिसतील. फ्रेंडलिस्टमध्ये नसणाऱ्यांना एकही पोस्ट दिसणार नाही. या फीचरचा वापर करून प्रोफाईल लॉक कसे करायचे, ते जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

प्रोफाईल लॉक करण्यासाठी सर्वात प्रथम फेसबुक अ‍ॅपवर जावे. येथे उजव्या बाजूला तीन लाईनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

Image Credited – Amarujala

यावर क्लिक केल्यानंतर खाली सेटिंग्स आणि प्रायव्हेसी हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. येथे पुन्हा सेटिंग पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा.

Image Credited – Amarujala

त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल लॉकिंगचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

Image Credited – Amarujala

येथे तुम्हाला लॉक योर प्रोफाईल हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुमचे फेसबुक प्रोफाईल लॉक होईल. याच प्रोसेसद्वारे तुम्ही आपले प्रोफाईल अनलॉक देखील करू शकता.