2021च्या आधी कोरोना प्रतिबंधक लस येण्याची शक्यता कमी – डब्ल्यूएचओ

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम विविध देशात सुरू आहे. यावर आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 2021 आधी कोरोना प्रतिबंधक लस बनण्याची आशा नसल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने रशिया, चीन, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात सुरू असलेल्या लसीच्या ट्रायलबाबत स्पष्टीकरण देताना स्थिती स्पष्ट केली. डब्ल्यूएचओनुसार, पुढील वर्षीपर्यंत लस मिळण्याची शक्यता आहे. मात्र याच्या उत्पादन आणि वितरणामध्ये वेळ लागू शकतो.

डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक माइक रयान म्हणाले की, कोरोना व्हायरसवरील लसीबाबत संशोधकांना यश मिळत आहे. परंतु, वर्ष 2021 च्या सुरूवाती महिन्यांच्या आधी याची आशा करता येणार नाही. ते म्हणाले की, भलेही लस बनण्याची गती थोडी हळू असावी, मात्र सुरक्षेच्या मानकांमध्ये कोणतीही कमतरताअसता कामा नये.

रयान म्हणाले की, लोकांना ही लस देण्याआधी हे सुनिश्चित करायचे आहे की लसीला सुरक्षित आणि प्रभावी बनविण्यासाठी आम्ही आवश्यक ती काळजी घेतली आहे. हे करण्यास थोडा वेळ लागेल. मात्र आम्ही लोकांना पुढील वर्षीच्या सुरूवातीलाच लस टोचण्यास सुरूवात करणार आहोत.