या आयएएस अधिकाऱ्याने अभिनयाच्या क्षेत्रात ठेवले पाऊल, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

यूपीएससीची परीक्षा पास होऊन आयएएस अधिकारी बनने सोपे नाही. सोशल मीडियावर एक असाच आयएएस अधिकारी चर्चेत आहे, ज्याने अभियनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. एक म्यूझिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या अधिकाऱ्याची जोरदार चर्चा आहे. दिल्लीच्या या अधिकाऱ्याचे नाव अभिषेक सिंह आहे. आयएएस अधिकारी असून, त्यांनी म्यूझिक व्हिडीओमध्ये अभिनय केल्याचे लोकांना समजताच ते सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले.

इंडिया टुडेला अभिषेक यांनी सांगितले की, आयएएस, आयपीएल क्षेत्रात शुटिंगचा अर्थ वेगळा होता. मात्र मला आयुष्यात काहीना काही नवीन करण्याची आवड आहे. त्यामुळे मी हे निवडले. सध्या अभिषेक हे दिल्लीत डेप्युटी कमिश्नर आहेत. ते लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘दिल्ली क्राइम-2’ सीरिजमध्ये देखील दिसणार आहेत.

Image Credited – Aajtak

त्यांनी सांगितले की, याची सुरूवात मागील वर्षी झाली. मुकेश छाबडाच्या ऑफिसमध्ये लंच करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तेथे दिल्ली क्राइम 2 ची टीम आली होती. त्यांची भेट झाली. त्यांना माझी पर्सनालिटी आवडली. त्यांनी मला अभिनय करशील का असे विचारले, येथूनच सुरूवात झाली.

त्यानंतर टी-सीरिजची टीम दिल तोड या गाण्यासाठी कलाकाराच्या शोधात होती. त्यांना अभिषेक यांचे फोटो आवडले व गाण्यात काम करण्याविषयी विचारले. यावर अभिषेक यांनी देखील तयारी दर्शवली. अभिषेक यांची पत्नी देखील आयएएस आहे.

Image Credited – Aajtak

बॉलिवूडमधील मोठा प्रोजेक्ट मिळाल्यावर आयएएस सोडणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले, हा प्रश्नच नाही. माझी ओळख ही आयएएस आहे. माझे पहिले प्रेम आयएएस आहे. जेवढा आनंद लोकांवर प्रेम करण्यात, समाज आणि देशासाठी काम करण्यात मिळतो, तेवढा कशातच मिळत नाही.