कोरोना चाचण्यांमध्ये अमेरिका अव्वल तर दुसऱ्या स्थानी भारत

जगभरात कोरोना व्हायरस महामारीचे संकट आहे. कोरोनामुळे सर्वात प्रभावित देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत टेस्टिंग देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारद्वारे कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, कोरोना व्हायरस टेस्टिंगमध्ये अमेरिका जगात सर्वात पुढे असून, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर भारत आहे.

अमेरिकेत आतापर्यंत 38 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून, जवळपास 1.40 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प म्हणाले की, एक कुटुंबाच्या नात्याने आपण प्रत्येक मृत्यूवर दुःख व्यक्त करतो. मी त्यांच्या सन्मानात प्रतिज्ञा करतो की आपण एक लस विकसित करून आपण कोरोनावर मात करू. लस बनविणे आणि वैद्यकीय विकासाच्या दिशेने आपण चांगले काम करत आहोत.

कोरोना प्रतिबंधक लस लवकरच तयार होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कोव्हिड-19 च्या चाचणीच्या दृष्टीने अमेरिका जगात सर्वात पुढे आहे. आपण 50 कोटी अधिक चाचण्यांच्या जवळ आहोत. भारत दुसऱ्या स्थानावर असून, तेथे 1.2 कोटी टेस्ट झाल्या आहेत. तर इतर ठिकाणी 70-40 लाख चाचण्या झाल्या आहेत. टेस्टिंगच्या दृष्टीने अमेरिका चांगले करत आहे.

Loading RSS Feed