तब्बल 5 कोटी किंमतीचे दुर्मिळ सोनेरी घुबड आणि दोन तोंडी साप तस्करांकडून जप्त

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एसटीएफने वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या एका गटाला अटक केले आहे. प्राण्यांची तस्करी करणाऱ्या जवळपास 1 डझन आरोपींना अटक करण्यात आले आहे. यामध्ये 4 महिलांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून एका सोनेरी घुबड आणि दोन तोंड असणारा साप जप्त करण्यात आला आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रुपये आहे.

Image Credited – Navbharattimes

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, उज्जैन एसटीएफचे एसपी नितेश गर्ग यांनी सांगितले की, या तस्करांकडून सोनेरी घुबड आणि दोन तोंडी साप (रेड सँब बोआ) जप्त करण्यात आला आहे. हे दोन्ही जीव दुर्मिळ आहेत. सोनेरी घुबडाला तस्कर तांत्रिय क्रियासाठी विकतात, ज्याची बाजारात किंमत जवळपास 3 कोटी रुपये आहे. तर दोन तोंडी सापाचा वापर हा औषध बनविण्यासाठी केला जातो व याची किंमत जवळपास 2.25 कोटी रुपये आहे.

Image Credited – Navbharattimes

एसटीएफने सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करत त्यांची चौकशी सुरू केली आहे. हे काम तस्कर कधीपासून करत आहेत व किती वन्यजीवांना विकले आहे, याची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे.