व्हिडीओ : गाढवाची मुलाखत घेत पत्रकाराने उडवली मास्क न वापरणाऱ्यांची मजेशीर खिल्ली

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात मास्क घालणे अनिवार्य आहे. सरकार देखील मास्क वापरण्यास आणि सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचे नागरिकांना आवाहन करत आहे. असे असले तरी काही लोक अद्यापही कोरोना व्हायरसला गंभीरतेने न घेता मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे. अशा लोकांना मास्क घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी बिहारच्या एका पत्रकाराने मजेशीर आणि प्रभावी पद्धत शोधली आहे. या पत्रकाराने उपरोधिकरित्या मास्क न वापरणाऱ्यांची गाढवाशी तुलना केली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Posted by Amit Kumar on Saturday, July 18, 2020

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पत्रकार सर्वात आधी गाढवाला प्रश्न विचारत आहे की मास्क न लावता रस्त्यावर का बसला आहात ? यानंतर पत्रकार रस्त्यावर मास्क न लावता फिरणाऱ्यांना देखील हाच प्रश्न विचारतो.

गाढवाची मुलाखत घेतल्यानंतर पत्रकार येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारतो की, ज्याने मास्क नाही लावला तो गाढव आहे. यानंतर व्यक्तीने हा म्हणताच पत्रकार म्हणतो, मग मोठ्याने सांगा ना, आम्ही गाढव आहोत.

सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांमध्ये जागृकता पसरविण्यासाठी पत्रकारने वापरलेली पद्धत नेटकऱ्यांना भलतीच आवडली. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. येथे पत्रकाराचा उद्देश कोणाचीही खिल्ली उडवणे हा नसून, लोकांना केवळ जागृक करणे हा होता.