… म्हणून पायलट यांनी काँग्रेस आमदाराला नोटीस पाठवत केली 1 रुपये नुकसान भरपाईची मागणी

राजस्थानच्या सत्ता संघर्षामध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आमदार गिरिराज सिंह मलिंगा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये त्यांनी गिरिराज यांना माफी मागण्यास आणि 1 रुपये रक्कम देण्यास सांगितले आहे. सोबतच म्हटले आहे की, 7 दिवसांच्या आत माफी न मागितल्यास सिव्हिल आणि मानहानीची तक्रार केली जाईल. या संदर्भात एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

बसपामधून काँग्रेसमध्ये आलेले आमदार गिरिराज मलिंगा यांनी पायलट यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी 35 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. हे डिसेंबरमध्ये झाले होते व मी त्यांना नकार दिला होता.

पायलट यांनी आमदाराविरोधात योग्य व कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे. ते म्हणाले होते की, अशा आरोपांमुळे मी नाराज आहे, मात्र हैराण नाही. असे करून माझी प्रतिमा मलीन करण्याचे काम केले जात आहे. खऱ्या मुद्याकडून लक्ष भटकविण्यासाठी हे केले जात आहे. आता 35 कोटींच्या आरोपावरून सचिन पायलट यांनी काँग्रेस आमदाराला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.