नशीब फळफळले; मौल्यवान हिरा सापडल्यामुळे मालामाल झाला खाण कामगार

हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात एका 35 वर्षीय व्यक्तीला खाणीत खोदकाम करताना 10.69 कॅरेटचा उच्च दर्जाचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याला लिलावामध्ये 50 लाख ते 1 कोटी रुपये मिळू शकतात.

हिरा कार्यालय पन्नाचे अधिकारी आर. के. पांडे यांनी सांगितले की, आनंदी लाल कुशवाहा या व्यक्तीला 10.69 कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला. हा हिरा पन्ना जिल्हा मुख्यालयापासून 15 किमी लांब राणीपूरच्या उथली हिरा खाणीत सापडला.

त्यांनी सांगितले की, कुशवाह यांनी या हिऱ्याला कार्यालयात जमा केले असून, आता त्याला विकण्यासाठी त्याच लिलाव केला जाईल. या लिलावातून जे काही पैसे मिळतील, त्यातून कर कपात करून व्यक्तीला पैसे दिले जातील.

आनंदी लाल कुशवाह यांनी सांगितले की, या आधी देखील याच खाणीत खोदकाम करताना मला 70 सेंटचा हिरा सापडला होता. आता 10.69 कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला आहे.