चक्क चीपद्वारे मेंदूमध्ये वाजणार गाणी, मस्क यांचा दावा

टेस्ला आणि स्पेस-एक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांची एआय फर्म न्यूरोलिंक एक ब्रेन-कॉम्प्यूटर इंटरफेस विकसित करत आहे, ज्याच्या मदतीने म्यूझिक थेट मेंदूमध्ये ऐकू येईल. ट्विटरवर कॉम्प्यूटर वैज्ञानिक ऑस्टिन हॉवर्डला उत्तर देताना मस्क यांनी स्पष्ट केले की, न्यूरोलिंक टेक्नोलॉजीच्या मदतीने यूजर्स म्यूझिक थेट चीपच्या मदतीने ऐकू शकतील.

मस्क यांनी मोबाईल डिव्हाईस आणि इतर संबंधी गोष्टींमध्ये तज्ञ असलेल्यांना न्यूरोलिंकमध्ये ज्वॉईन होण्यास देखील सांगितले. या संदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. उच्च-मात्रा, उच्च-विश्वसनीयता आणि कमी किंमतीच्या उत्पादन समस्यांचे निराकरण करण्याच्या गरजेवरही मस्क यांनी भर दिला . मस्क यांच्यामते हे तंत्रज्ञान मेंदू/ मणक्यांच्या जखमांचे निराकरण करू शकते आणि एआय हे जीवनासाठी आवश्यक आहे.

न्यूरोलिंकने मागील वर्षी ब्रेन ऑन चीफवरील पडदा हटवला होता. या चीपच्या मदतीने पॅरालिसिस किंवा मेंदूच्या समस्या असणारी व्यक्ती काम करू शकते. कंपनीचा दावा आहे की ही चीप कायमस्वरूपी टिकू शकते. तसेच कंपनीची या वर्षी चीपचे ट्रायल करण्याची योजना आहे.

ही चीप आयफोनमधील एन1 सेंसर नावाच्या अ‍ॅपद्वारे नियंत्रित करता येईल. याशिवाय यूएसबी पोर्टशी देखील जोडता येईल. यामध्ये 96 थ्रेड्स असतील व प्रत्येक थ्रेड हा मनुष्याच्या केसांपेक्षाही अधिक लहान व पातळ असेल. कंपनी या पुढील महिन्यात या ब्रेन-कॉम्प्यूटर इंटरफेस टेक्नोलॉजीबद्दल माहिती देणार आहे.