चीनकडून डब्ल्यूएचओ प्रमुखांचा घोडेबाजार, अमेरिकेचा गंभीर आरोप

कोरोना व्हायरस महामारी रोखण्यात आलेल्या अपयशावरून अमेरिकेने पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला आहे.  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी, चीनने डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना खरेदी केले होते, अशी टीका केली आहे. डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्यांनी यावर म्हटले की, संस्था अशा आरोपांकडे दुर्लक्ष करते व विविध देशांनी महामारी रोखण्यावर काम करावे.

लंडनच्या खासदारांसोबतच्या एका खाजगी बैठकीत माइक पॉम्पियोनी डब्ल्यूएचओवर गंभीर आरोप केले आहे. डब्ल्यूएचओ अपयशी ठरल्याने ब्रिटनमध्ये अधिक मृत्यू झाले आहेत, असे पॉम्पियो म्हणाले.

पॉम्पियो यांच्यानुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहॅनम गेब्रियेसुस यांनी निवडणूक जिंकण्यास मदत करण्यासाठी चीनसोबत डील केली होती. त्यांच्या या डीलमुळे अनेकांचा मृत्यू झाला.

पॉम्पियो म्हणाले की, डब्ल्यूएचओ एक राजकीय संस्था बनली आहे आणि कोरोना महामारीचा सामना करण्यास अपयशी ठरले आहे.