नितीन नांदगावकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी


मुंबई – विधानसभा निवडणुकी दरम्यान मनसेची साथ सोडून शिवसेनेत दाखल झालेले डॅशिंग नेते नितीन नांदगावकर यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नितीन नांदगावकर यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नितीन नांदगावकर यांची डॅशिंग नेते अशी ओळख आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ते मनसेत होते. मनसेतून त्यांनी ऑगस्ट महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला. यासंदर्भात आता नितीन नांदगावकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काल सकाळी ११ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास त्यांना फोनवरुन धमकी देण्यात आली आणि शिवीगाळ करण्यात आल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.