सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता या पत्रकाराची होणार चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. बांद्रा पोलीस प्रत्येक अँगलने तपास करत आहे. आतापर्यंत अनेक निर्माते, कलाकारांची पोलिसांनी चौकशी केली असून, आता पोलीस प्रसिद्ध चित्रपट समिक्षक राजीव मसंद यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, पोलिसांनी राजीव मसंद यांना सुशांत प्रकरणात चौकशीसाठी आज बोलवले आहे. राजीव मसंदने सुशांतबाबत अनेक नकारात्मक व वाईट लेख लिहिले होते. सुशांतच्या चित्रपटांना नेगेटिव्ह रेटिंग देखील दिले होते. राजीवने काही लोकांच्या सांगण्यावरून सुशांतच्या चित्रपटाला खराब रेटिंग दिले, असे सांगितले जात आहे.

या प्रकरणात आतापर्यंत अनेक हाय-प्रोफाईल लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे. अनेकांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची देखील मागणी केली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती केली आहे.