कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जवानांना मिळणार शहीदाचा दर्जा

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कठीण काळात कोरोना यौद्धे आपला जीव धोक्यात घालून लोकांची सुरक्षा करत आहेत. मात्र अशा स्थितीमध्ये त्यांनाही या आजारीची लागण होत आहे. आता सरकारने निर्णय घेतला आहे की जे पॅरामिलिट्री सैनिक ड्यूटीवर तैनात आहे, अशा जवानांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्यास त्यांना शहीदाचा दर्जा दिला जाईल.

ज्या जवानांचा कोरोनामुळे मृत्यू होईल, अशांच्या कुटुंबाना ‘भारत के वीर’ फंडातून 15 लाक रुपये मदत निधी दिला जाईल. या संदर्भात सुरक्षा दलाने सरकारला प्रस्ताव पाठवला होता, ज्याला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूरी दिली आहे.

कोरोना शहीदांची सर्व माहिती भारत के वीर पोर्टलवर अपलोड केली जात आहे. एखाद्याला जर त्यांच्या कुटुंबाना मदत करायची असल्यास, अकाउंटची माहिती देखील दिली जाईल. याशिवाय थेट भारत के वीर फंडमध्ये योगदान देता येईल.

2017 साली केंद्री गृह मंत्रालयाने शहीद जवानांच्या कुटुंबासाठी पैसे जमा करण्यासाठी भारत के वीर वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपची सुरूवात केली होती. याद्वारे सर्वसामान्य लोक थेट ऑनलाईन माध्यमातून जवानांच्या कुटुंबाना मदत करू शकतात.