जिओ सर्वात प्रथम मुंबई आणि दिल्लीत करणार 5जी ट्रायल

रिलायन्स जिओने 5जी टेक्नोलॉजीवर वेगाने पुढे जाण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने सरकारकडे काही खास फ्रिक्वेंसीसाठी स्पेक्ट्रम मागितले आहेत. याशिवाय कंपनी सर्वात प्रथम मुंबई आणि दिल्लीमध्ये 5जी चे ट्रायल करणार आहे.

रिलायन्स जिओने दिल्ली आणि मुंबईमध्ये 5जीच्या ट्रायलसाठी दूरसंचार विभागाकडे 17 जुलैला स्पेक्ट्रमसाठी विनंती केली होती. कंपनीने 26 गीगाहर्ट्ज आणि 24 गीगाहर्ट्ज बँडमध्ये 800 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी आणि 3.5 गीगाहर्ट्ज बँडमध्ये 100 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमची मागणी केली आहे.

आजतकच्या वृत्तानुसार, जिओचे म्हणणे आहे की, अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान, कॅनडा आणि ब्रिटन सारख्या देशांमध्ये हाय फ्रिक्वेंसीचा वापर केला जातो. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी कंपनीला या बँडमध्ये ट्रायल करायचे आहे. आधीपासूनच अनेक ट्रायल सुरू आहेत.

जिओने 26.5-29.5 गीगाहर्ट्ज आणि 24.25-27.5 गीगाहर्ट्ज बँड फ्रिक्वेंसीमधील स्पेक्ट्रम मागितले आहे. या हाय फ्रिक्वेंसी स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राची संस्था आंतरराष्ट्रीय टेलिकम्यूनिकेशन यूनियनने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये 26 गीगाहर्ट्जला 5जी स्टँडर्डसाठी मंजूरी दिली होती. तर दुसऱ्या बँडसाठी अद्याप स्टँडर्ड निश्चित नाही. काही दिवसांपुर्वीच अमेरिकन कंपनी क्वॉलकॉम वेंचर्सने जिओमध्ये 730 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे जिओ प्लॅटफॉर्म्सला 5जी प्लॅन पुढे नेण्यास मदत मिळेल. कारण या कंपनीकडे 5जी टेक्नोलॉजीच्या बाबतीत विशेषज्ञता आहे.