कोरोना संकट काळातील सरकारच्या विशेष कामगिरीचा राहुल गांधींनी वाचला पाढा

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील सध्या कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या पुढे गेला आहे. राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधत या संकटाच्या काळात सरकारच्या कामगिरीचा पाढाच वाचला आहे. मागील 7 महिन्यात सरकारने काय केले हे राहुल गांधींनी सांगितले आहे.

राहुल गांधींनी ट्विट करत राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील मोदी सरकारवर केला आहे.

राहुल गांधींनी ट्विट केले की, कोरोना काळातील सरकारची उपलब्धी : फेब्रुवारी – नमस्ते ट्रम्प, मार्च – मध्य प्रदेशमधील सरकार पाडले, एप्रिल – मेणबत्ती पेटवली, मे – सरकारला 6 वर्ष पुर्ण, जून – बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली, जुलै – राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न. त्यामुळे देश कोरोनाच्या लढाईत आत्मनिर्भर आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.