राहुल बजाज यांच्या पद सोडण्याच्या घोषणेनंतर गडगडले कंपनीचे शेअर

बजाज फायनान्सचे चेअरमन राहुल बजाज यांनी मोठा निर्णय घेत, या महिन्याच्या अखेर कंपनीच्या चेअरमन पदावरून हटणार असल्याचे सांगितले आहे. राहुल बजाज यांनी 31 जुलैला चेअरमन पदावरून हटण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ते कंपनीच्या नॉन-एग्झिक्यूटिव्ह नॉन इंडिपेंडेट डायरेक्टर पदावर कायम राहतील.

राहुल बजाज हे चेअरमन पद सोडणार असल्याची माहिती येताच आज कंपनीचे शेअर्स घसरले. कंपनीचे शेअर आधीच घसरलेले होते. मात्र राहुल बजाज यांच्या निर्णयामध्ये बीएसईवर कंपनीचे शेअर 6.5 टक्क्यांनी घसरले.

राहुल बजाज यांची जागा त्यांचा मुलगा संजीव बजाज हे घेणार आहेत. कंपनीच्या सुरूवातीपासून राहुल बजाज हे कंपनीचे काम पाहत होते. 1987 मध्ये कंपनीची स्थापना झाली होती. 1 ऑगस्ट रोजी संजीव बजाज कंपनीचे चेअरमन म्हणून कार्यभार स्विकारतील. ते सध्या वॉइस चेअरमन आहेत.

संजीव बजाज हे बजाज आलियांज लाईफ इंश्योरेंस कंपनी आणि बजाज आलियांज जनरल इंश्योरेंस कंपनीच्या बोर्डमध्ये 2013 सालापासून आहेत. ते बजाज होल्डिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून देखील काम करत आहेत.