पाकिस्तानचा मित्रराष्ट्राला मोठा झटका, चीनच्या या अ‍ॅपवर घातली बंदी

पाकिस्तानच्या सरकारने आपला मित्र चीनला मोठा झटका दिला आहे. भारतानंतर आता पाकिस्तानने देखील चीनच्या बिगो अ‍ॅपवर बंदी घातली आहे. सोबतच टीक-टॉकला अखेरचा इशारा दिला आहे. पाकिस्तानमध्ये अश्लील आणि अनैतिक साम्रगी दाखवत असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. या आधी पाकिस्तानने गेमिंग अ‍ॅप पबजीवर बंदी घातली होती.

मागील आठवड्यात लाहौरच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत टीक-टॉकवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनुसार, हे अ‍ॅप आधुनिक काळात वाईट आहे. टीक-टॉक पोर्नोग्राफीचा मोठा स्त्रोत आहे. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, टीक-टॉक आणि बिगोबाबत समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या होत्या.

पाकिस्तानी सरकारने म्हटले की, दोन्ही अ‍ॅपकडून आलेले उत्तर समाधानकारक नाही. यानंतर सरकारने बीगोवर बंदी घालत, टीक-टॉकला शेवटचा इशारा दिला आहे.

Loading RSS Feed