कोरोनाकडे लक्ष भटकवून चीनने केला भारतीय क्षेत्रावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न – अमेरिकन काँग्रेस

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरण अधिनियमातील (एनडीएए) दुरुस्तीला सर्वसंमतीने मंजूरी दिली आहे. या दुरूस्तीमध्ये गलवान खोऱ्यातील भारताविरोधातील चीनची आक्रमकता आणि दक्षिण चीन सागरा सारख्या विवादित क्षेत्रात चीनचे वाढते अस्तित्व यावर निशाणा साधण्यात आला आहे. भारतीय-अमेरिकन खासदार एमी बेराने काँग्रेस सदस्य स्टिव्ह शॅबेट यांच्यासोबत मिळून एनडीएए संशोधन सादर केले होते.

या संशोधनात म्हटले आहे की, भारत-चीन सैन्यामध्ये पुर्व लडाखच्या एलएसीवरील अनेक भागात संघर्ष सुरू आहे. येथी परिस्थिती एवढी बिघडली होती की ज्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. एलएसी, दक्षिण चीन सागर आणि सेनकीकू द्वीप सारख्या भागात चीनचा विस्तार आणि आक्रमकता गंभीर चिंतेचा विषय आहे. प्रतिनिधी सभेने या दुरूस्तीला मंजूरी दिली.

द्विपक्षीय संशोधनात भारताविरोधातील चीनच्या आक्रमकतेचा विरोध करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, चीनने कोरोना व्हायरसवर लक्ष भटकवून भारतीय क्षेत्रावर ताबा मिळविण्याचा व दक्षिण चीन सागरात देखील क्षेत्रीय दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.