चीनच्या कुरापतींवर लक्ष ठेवणार भारताचा तिसरा डोळा

पुर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय सैन्याला देशातच तयार करण्यात आलेले ‘भारत’ ड्रोन मिळाले आहेत. या स्वदेशी ड्रोनला डीआरडीओने तयार केले आहे. या ड्रोनच्या माध्यमातून भारतीय सैन्य पुर्व लडाखमध्ये एलएसीसोबतच उंचावरील क्षेत्र आणि पर्वतीय भागात अचूक लक्ष्य ठेवू शकेल. सीमावादामुळे भारताला अचूक लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची आवश्यकता होती.

या ड्रोनला चंदीगडमधील डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आले आहे. भारत सीरिज अंतर्गत बनविण्यात आलेले हे ड्रोन जगातील सर्वात वेगवान आणि हलक्या ड्रोन पैकी एक असल्याचे सांगितले जाते.

आशियानेट न्यूजच्या वृत्तानुसार, लहान मात्र आतापर्यंतचे सर्वात शक्तीशाली ड्रोन भारत अचुकतेसोबत कोणत्याही ठिकाणी स्वायत्तपणे काम करते. अग्रिम रिलीज तंत्रज्ञानासोबत यूनिबॉडी बायोमिमेटिक डिझाईन लक्ष ठेवण्यासाठी याला अधिक घातक बनवते. याशिवाय ड्रोनमध्ये कृत्रिम गुप्त तंत्र देखील आहे. जे शत्रू किंवा मित्राचा शोध घेते.

ड्रोन हे थंड भागात देखील काम करण्यास सक्षम आहे. भारत ड्रोन मिशन दरम्यान रिअल टाईम व्हिडीओ पाठवू शकतो. गडद अंधारात जंगलात लपलेल्या व्यक्तीचा देखील याच्या माध्यमातून शोध घेता येईल. हे ड्रोन रडारन देखील डिटेक्ट करता येत नाही.