UPPCLमध्ये १०वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती; मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पगार


नवी दिल्ली – 600हून अधिक पदांसाठी उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (UPPCL) नोकर भरती काढली असून पात्र व इच्छुक उमेदवार या भरती अंतर्गत आता 4 ऑगस्ट 2020पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सातव्या वेतन आयोगांतर्गत मॅट्रिक्स लेव्हल 4 नुसार UPPCL Technician Electrical Recruitment अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पगार देण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवाराला दरमहा 27,200 रुपये (किमान पगार) व इतर भत्ते दिले जाणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराकडे एका मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित व विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकलमधील कोणतेही 2 वर्षांचे प्रमाणपत्र (NCVT/SCVT) उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे Gen/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 1000 रुपये द्यावे लागतील. तर 700 रुपये अर्ज शुल्क अनुसूचित SC/STच्या उमेदवारांना द्यावे लागतील. ऊर्जा विभागात 608 तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) पदांच्या भरतीसाठी UPPCLने अर्ज मागविले आहेत. uppcl.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी पहिल्यांदा अर्जाची शेवटची तारीख 22 जुलै 2020 ठरवण्यात आली होती. पण ती वाढवून आता UPPCLने 04 ऑगस्ट 2020 केली आहे. त्याचबरोबर 6 ऑगस्ट 2020पर्यंत या भरतीसाठी अर्ज शुल्क फी जमा करता येणार आहे. 18 वर्षे ते 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पण राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना 5 वर्षांची सवलत मिळणार आहे. 1 जानेवारी 2020 पर्यंत वयाची मर्यादा ग्राह्य धरली जाणार आहे.

Loading RSS Feed