‘मी येथे भाजी विकायला आलेलो नाही, मी राजस्थानचा मुख्यमंत्री आहे’

राजस्थानमधील सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट एकमेकांवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर टीका केली आहे.

गेहलोत म्हणाले की, सचिन पायलट भाजपच्या समर्थनाने मागील 6 महिन्यांपासून कट रचत होते. सरकार पाडण्याचा कट रचला जात असल्याचे जेव्हा मी सांगत होतो, त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. कोणालाही माहिती नव्हते की, निरागस चेहरा असणारी व्यक्ती असे काम करेल. मी येथे भाजी विकायला आलेलो नाही. मी राजस्थानचा मुख्यमंत्री आहे.

गेहलोत पुढे म्हणाले की, एक छोटी बातमी कोणी वाचली नसेल की पायलट साहेबांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले पाहिजे. आम्हाला माहिते आहे ते निरुपयोगी व काहीही कामाचे नाहीत. काहीही काम करत नाही, केवळ लोकांमध्ये भांडण लावत आहे.  इतिहासातील हे पहिले उदाहरण असेल जेव्हा पक्षाचा अध्यक्षच आपल्याच सरकारला पाडण्याच्या कटात सहभागी होता.

ते म्हणाले की, ज्या प्रदेशाध्यक्ष पायलट यांना प्रदेशात एवढा सन्मान मिळाला, ते काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्यास तयार झाले.