आता कॅनडामध्ये भारतीय समुदायाने चीनविरोधात केले निदर्शन

कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक देश चीनच्या विरोधात झाले आहे. जे देश आधी गप्प होते, त्यांना देखील कोरोनामुळे चीनविरोधात बोलण्याची संधी मिळाली आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये चीनविरोधात निदर्शन होत आहे. कॅनडाच्या टोरंटो येथे भारतीय समुदायासोबत मिळून अनेक देशांच्या नागरिकांनी चीनच्या विरोधात प्रदर्शन केले.

कॅनडाच्या टोरंटो चीन कॉन्सूलेटच्या बाहेर कम्यूनिस्ट पार्टी ऑफ चायनाविरोधात निदर्शन करण्यात आले. या दरम्यान टोरंटोचे स्थानिक लोक, इराणचे नागरीक, तिबेट, व्हिएतनामचे लोक देखील उपस्थित होती. भारतीय लोक देखील या विरोध प्रदर्शनात सहभागी झाले होते.

चीनसोबतच्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनच्या विरोधातील नागरिकांमधील रोष वाढला आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये भारतीय समुदायाचे लोक चीनविरोधात निदर्शन करत आहेत.  इराण-चीनमधील एका करारामुळे इराणचे नागरिक विरोध करत आहेत. तर दक्षिण चायना समुद्रावरून व्हिएतनाम चीनला विरोध करत आहे.

Loading RSS Feed