एक लाखांपेक्षा अधिक भारतीय अमेरिकन्सने पाहिली ‘हिंदूज4ट्रम्प’ रॅली

अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात आयोजित हिंदूज4ट्रम्प रॅलीला विक्रमी संख्येत 1 लाखांपेक्षा अधिक भारतीय अमेरिकन नागरिकांनी पाहिले.

ट्रम्प विक्ट्री इंडिया अमेरिकन फायनेंन्स कमेंटीचे उपाध्यक्ष अल मैसन डिजिटल रॅलीला संबोधित करताना म्हणाले की, मागील सहा महिन्यात दिसून आले की 1992 पासून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक उमेदवारासाठी मदत करणारे भारतीय-अमेरिकन पहिल्यांदा रिपब्लिकन उमेदवाराचे समर्थन करत आहेत. अमेरिकन4हिदूंने सांगितले की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि समूहावर 30 हजार लोकांनी रॅलीचे थेट प्रसारण पाहिले आणि त्यानंतर जवळपास 70 हजार लोकांनी ऑनलाईन पाहिले.

मॅसन म्हणाले की, भारतीय-अमेरिकन मतदार रिपब्लिकन पक्षाचे समर्थन करतात, कारण त्यांना ट्रम्प आवडतात. जेव्हा हाउडी मोदी कार्यक्रम झाला होता, तेव्हा संपुर्ण जग काश्मिरबाबत बोलत होते. त्यावेळी केवळ ट्रम्प यांच्याकडे ह्यूस्टनमध्ये रॅली करण्याची हिंमत होती.

अमेरिकन5हिंदूचे सह-संस्थापक आणि सह-अध्यक्ष राज भयानी म्हणाले की, आम्ही राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात अधिकाधिक भारतीय-अमेरिकन्सचे मत मिळविण्यासाठी मेहनत करू.