चक्क कॉफी बीन्समध्ये लपवले होते कोकेन, तरीही पोलिसांनी पकडली चोरी

इटलीमध्ये तस्करीचा एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. इटलीच्या पोलिसांनी कॉफीचे काही पाकिट जप्त केली होती. यानंतर पोलिसांनी कॉफीच्या प्रत्येक बीजला चिरून बघितले. आतमध्ये जे निघाले ते हैराण करणारे होते. या कॉफी बीजमध्ये चक्क कोकेन लपविण्यात आले होते. तस्कर कितीही हुशार असला, तरी पोलिसांनी त्याची हुशारी पकडली.

पोलिसांना आढळले की एका सर्वसाधारण कॉफी बॅगला चित्रपट जॉन विक : चॅप्टर 2 मधील माफिया डॉन सँटिनो डी ऑन्टोनियोचे नाव दिले आहे, त्यावेळी पोलिसांना शंका आली. त्यांनी तपास सुरू केला आणि प्रत्येक कॉफी बीजला चिरून बघितले. यातील 500 बीजमध्ये कोकेन लपविण्यात आल्याचे आढळले.

GdF Varese

#Cocaina nei chicchi di caffè. Arrestato dalla #GDF di #Varese, in provincia di #Firenze, un responsabile che ha tentato di importare, all’interno di 2 Kg. di pregiato caffè colombiano, un ingente quantitativo di sostanza #stupefacente.#NoiconVoi#aeroportomalpensa

Posted by Guardia di Finanza on Friday, July 17, 2020

पोलिसांनी कॉफी बीजमधून 150 ग्रॅम कोकेन मिळाले. या बियांणा टेपच्या मदतीने चिटकवण्यात आले होते. कॉफी आणि टेपचा रंग एवढा एकसारखा होता की कोणालाही दोघांमधील फरक समजला नसता.

पोलिसांनुसार, हे पॅकेज कोलंबियाच्या मेडेलिनवरून मिलानच्या मालपेंसा विमानतळावर पाठविण्यात आले होते. हे पाकिट घेण्यासाठी आलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केले आहे.