कोलेस्ट्रॉलच्या औषधाने 5 दिवसात कोरोना नष्ट, वैज्ञानिकांचा दावा

कोरोना व्हायरसवरील औषध आणि लसीबाबत जगभरात संशोधन सुरू आहे. अनेक देशातील वैज्ञानिक यावर काम करत आहेत. अभ्यासातून नवनवीन माहिती समोर येत आहे. आता दोन वैज्ञानिकांनी दावा केला आहे की कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधाद्वारे कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे.

Image Credited – Aajtak

जेरुसलेमच्या हिब्रू यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक याकोव नहमियास आणि न्यूयॉर्कचे इकाहम स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. बेंजामिन टेनओव्हर मागील तीन महिन्यांपासून कोरोनावरील औषधाबाबत अभ्यास करत आहेत. त्यांना कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधाचे चांगले परिणाम मिळाले. कोरोना व्हायरस रुग्णाच्या फुफ्फूसांना कशाप्रकारे प्रभावित करते, यावर प्राध्यापकांनी लक्ष केंद्रीत केले. वैज्ञानिकांना आढळले की, व्हायरस कार्बोहायड्रेटच्या रुटीन बर्निंगला रोखतात. यामुळे मोठ्या प्रमाणात फॅट फुफ्फूसाच्या पेशीमध्ये जमा होते.

Image Credited – Aajtak

दोन्ही वैज्ञानिकांनुसार, या अभ्यासातून हे समजण्यास मदत मिळते की हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल असणारे कोरोना रुग्ण हायरिस्क प्रकारात जातात. फेनोफायब्रेट औषधाच्या वापराने फुफ्फुसांमधील फॅट कमी करते. यामुळे कोरोना व्हायरस कमकुवत होतो आणि स्वतःची उत्पत्ती थांबवतो. लॅबमधील अभ्यासादरम्यान केवळ 5 दिवसांच्या उपचाराने व्हायरस नष्ट झाल्याचे आढळले.