Aadhaar संदर्भातील शंकेचे आता एका ट्विटने होणार समाधान


नवी दिल्ली – आपल्यासाठी कोणत्याही सरकारी अथवा बँकेच्या व्यवहारासाठी आधारकार्ड खूप महत्वाचा दस्तावेज बनला आहे. आजच्या स्थितीत जवळपास कोणत्याही प्रकाराचे काम असेल तरी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. आधार कार्ड सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. खासगी काम असेल तरी ओळखपत्र म्हणून आधारची मागणी केली जाते. त्यामुळेच आधारसाठी दिलेली माहिती ही अचूक असणे महत्त्वाचे आहे.

पण आपल्यापैकी अनेकांकडून अनेकदा आधार कार्डवरील नाव, पत्ता, फोन नंबर किंवा फोटोबाबत अक्षम्य चुका होतात. त्याचबरोबर याबाबत आधारकार्ड धारकांच्या वारंवार अनेक तक्रारी येत असतात. अशावेळेस काय करावे हे अनेकांना माहित नसते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, आधार कार्डसंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तसेच त्यासंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून UIDAI मदत करणार आहे. यासाठी तुम्हाला आधारबाबत असलेली कोणत्याही तक्रारी @UIDAI आणि @Aadhaar_Care यापैकी कोणत्याही ट्विटर हँडलच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत.

नागरिकांच्या सुविधेसाठी UIDAI ने सर्व सेवा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. आधार कार्डवरील नाव बदलण्यापासून ते फोन नंबर बदलण्यापर्यंत किंवा अन्य कोणत्या माहितीमध्ये बदल बदलण्यापर्यंत सर्व कामे आता ऑनलाइन करता येतात. कस्टमर केअर, फोन नंबर आणि इ-मेल आयडी पेक्षा वेगळी अशी आधारची ट्विटर सेवा आहे. 1947 हा UIDAI चा कस्टमर केअर क्रमांक आहे. त्याचप्रमाणे [email protected] वर मेल करून देखील तुम्ही आधार संबधित आवश्यक माहिती मिळवू शकता.