अरेच्चा! 74 चाकांच्या या ट्रकला केवळ 1700 किमी प्रवास पुर्ण करण्यास लागले तब्बल 1 वर्ष

सर्वसाधारणपणे सामानाने भरलेल्या ट्रकला 1700 किमीचा प्रवास करण्यासाठी जास्तीत जास्त 4-5 दिवस लागू शकतात. मात्र सोशल मीडियावर एका ट्रकचा फोटो व्हायरल होत आहे, ज्या ट्रकला एवढेच अंतर पुर्ण करण्यासाठी तब्बल 1 वर्ष लागले. ट्रकला आपल्या ठराविक ठिकाणी पोहचण्यासाठी लागलेल्या वेळेमागे कारण देखील तसेच आहे. 74 चाकांच्या या भारी भरक्कम ट्रकमध्ये 78 टन वजनी एक मशीन लोड होती. हा ट्रक महाराष्ट्रातून तिरुवनंतपुरमच्या साराभाई स्पेस सेंटरमध्ये पोहचला आहे. या प्रवासात ज्याने कोणी हा ट्रक बघितला प्रत्येकजण हैराण झाले.

हा ट्रक 9 जुलै 2019 ला महाराष्ट्रातून तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरसाठी रवाना झाला. यात एक एअरोस्पेस हॉरिजोंटल ऑटोक्लेव लोड आहे. ट्रकसोबतच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, ट्रकचा प्रवास 4 राज्यातून होऊन आता समाप्त झाला आहे. ट्रकच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गाडी प्रत्येकवेळी पुढे चालत असे.

78 टन मशीनचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय पुर्ण व्हावा यासाठी खराबे रस्ते देखील दुरुस्त करण्यात आले. रस्त्यात ट्रकला काही अडथळे येत असल्यास झाडांना देखील कापण्यात आले. लॉकडाऊनमुळे गाडी एक महिना आंध्रप्रदेशमध्ये अडकली होती. मात्र काँट्रॅक्ट एजेंसीला यात लक्ष्य घालावे लागले.या वोल्वो एमएम सीरिज ट्रकसोबत 30 सदस्यांची इंजिनिअर्स आणि मॅकेनिक्सची टीम देखील सोबत असे.

स्पेस सेंटरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मशीनला वेगवेगळे करता येत नाही. ऑटोक्लेवचा उपयोग अनेक कार्यक्रमांसाठी मोठ्या एअरोस्पेस प्रोडक्टच्या निर्मितीसाठी केला जाईल.