कल्याण-डोंबिवलीमधील शिथिलता, पण कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनच्या नियमांची अंमलबजावणी


मुंबई – कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रातील लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आल्यामुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या महापालिका क्षेत्रात १२ जुलै ते १९ जुलै या कालावधीसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. दरम्यान आजपासून लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याचे आदेश आयुक्तांनी काढले असले तरी, ३१ जुलैपर्यंत काही कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे.

२ ते १२ जुलै या कालावाधीत कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रात सुरूवातीला लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. दुधाची डेअरी, किराणा सामान आणि मेडिकल सकाळी ७ ते १० या वेळेत सुरु ठेवण्यात आली होती. तर संध्याकाळी ७ पर्यंत मेडिकलची वेळ करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १२ जुलैपासून लॉकडाउनला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर महापालिकेने तो लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याबद्दलचे आदेश काढले असले तरी, यातून कंटेनमेंट झोनला वगळण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉटच्या यादीत असलेले प्रभाग – टिटवाळा गणेश मंदिर (१/अ प्रभागक्षेत्र), मोहने गावठाण (१/अ प्रभागक्षेत्र), शहाड (१/अ प्रभागक्षेत्र), गांधारे (२/ब प्रभागक्षेत्र), बारावे गोदरेज हिल (२/ब प्रभागक्षेत्र), खडकपाडा (२/ब प्रभागक्षेत्र), वायले नगर (२/ब प्रभागक्षेत्र), फडके मैदान (२/ब प्रभागक्षेत्र), रामदासवाडी (२/ब प्रभागक्षेत्र), रामबाग सिंडीकेट (२/ब प्रभागक्षेत्र), बेतुरकरपाडा (३/क प्रभागक्षेत्र), चिखलेबाग-मल्हार नगर (३/क प्रभागक्षेत्र), अहिल्याबाई चौक (३/क प्रभागक्षेत्र), जोशीबाग (३/क प्रभागक्षेत्र), बैलबाजार (३/क प्रभागक्षेत्र), गोविंदवाडी (३/क प्रभागक्षेत्र), कोळसेवाडी (४/जे प्रभागक्षेत्र), कचोरे (४/जे प्रभागक्षेत्र), लोकग्राम (४/जे प्रभागक्षेत्र), शास्त्रीनगर-तिसगाव (५/ड प्रभागक्षेत्र), संतोषनगर-तिसगाव (५/ड प्रभागक्षेत्र), नेहरूनगर (५/ड प्रभागक्षेत्र), विजय नगर (५/ड प्रभागक्षेत्र), कांचनगाव खंबालपाडा (६/फ प्रभागक्षेत्र), चोळेगाव (६/फ प्रभागक्षेत्र), पेंडसे नगर (६/फ प्रभागक्षेत्र), टिळकनगर (६/फ प्रभागक्षेत्र), सारस्वत कॉलनी (६/फ प्रभागक्षेत्र), गोग्रासवाडी (६/फ प्रभागक्षेत्र), गरीबाचा वाडा (७/ह प्रभागक्षेत्र), देवीचा पाडा (७/ह प्रभागक्षेत्र), जय हिंद कॉलनी (७/ह प्रभागक्षेत्र), विष्णू नगर (७/ह प्रभागक्षेत्र), कोपररोड (७/ह प्रभागक्षेत्र), जुनी डोबिंवली (७/ह प्रभागक्षेत्र), राजाजी पथ (८/ग प्रभागक्षेत्र), म्हात्रेनगर (८/ग प्रभागक्षेत्र), तुकाराम नगर (८/ग प्रभागक्षेत्र), रघुवीर नगर (८/ग प्रभागक्षेत्र), पांडुरंगवाडी (८/ग प्रभागक्षेत्र), पिसवली (९/आय प्रभागक्षेत्र), चिंचपाडा-नांदीवली (९/आय प्रभागक्षेत्र), दावडी (९/आय प्रभागक्षेत्र), आजदे (१०/ई प्रभागक्षेत्र), डोबिंवली एमआयडीसी (१०/ई प्रभागक्षेत्र), सागाव-सोनारपाडा (१०/ई प्रभागक्षेत्र), नांदीवली-पंचानद (१०/ई प्रभागक्षेत्र), भोपर-संदप (१०/ई प्रभागक्षेत्र)