गुगल प्ले स्टोअर, अॅप स्टोअरवर उपलब्ध झाले JioMart App


नव दिल्ली – अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या दिग्गज ऑनलाईन रिटेल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी रिलायन्सने जिओमॉर्ट काही दिवसांपूर्वीच लॉन्च केले होते. त्यानंतर त्यांनी फेसबुक सोबत 43,574 कोटींचा करार केल्याची मोठी बातमी समोर आली. आता रिलायन्सने काही महिन्यांच्या टेस्टिंगनंतर जिओमार्ट हा अॅप अँड्रॉईड (Android) आणि आयफोन (iphone) युजर्ससाठी उपलब्ध केले आहे. जिओमार्ट अॅप हे आता गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.

देशातील 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये आतापर्यंत जिओमार्टची वेबसाईट टेस्टिंगसाठी वापरली जात आहे. ऑनलाईन वस्तू या वेबसाईटद्वारे मागवता येतात. युजर्संना जिओमार्ट या मोबाईल अॅपमुळे वस्तू ऑर्डर करणे सोयिस्कर ठरेल. देशातील इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओने जिओमार्ट अॅप लॉन्च केले आहे.

मुकेश अंबानी यांनी जिओमार्टच्या भविष्यातील विकासाबद्दल गेल्या आठवड्यात झालेल्या रिलायन्सच्या AGM-2020 मध्ये घोषणा केली आणि कंपनीच्या पुढच्या काही महिन्यातील ध्येयांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर रिलायन्स जिओमार्ट आणि व्हॉट्सअॅप यांचे टायअप करुन देशातील छोट्या व्यापारांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

तसेच सध्या दिवसाला 2,50,000 ऑर्डर्स जिओमार्टवर येत असून याची संख्या दिवसागणित वाढत आहे. सध्या जिओमार्टमध्ये किराणा सामान, धान्य, खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लवकरच यामध्ये इलेक्ट्रोनिक्स, फॅशन, औषधे आणि हेल्थकेअर वस्तूंचाही समावेश करण्यात येईल. जिओमार्ट अॅपमधून पेमेंट करताना तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, Sodexo, ROne loyalty points आणि कॅश ऑन डिलिव्हरी या ऑप्शनचा वापर करु शकता.

किराणा स्टोअर मालकांना जिओमार्ट या अॅपमुळे आपला व्यापार डिजिटली वाढवता येईल. यामुळे किराणा माल व्यापाऱ्यांना ग्राहकांसोबत व्यापार करणे अधिक सोयिस्कर होईल. किराणा माल व्यापारी आपल्या ग्राहकांसोबत जिओमार्ट अॅपद्वारे कनेक्ट होऊ शकतील आणि पैशांची देवाण घेवाणही करु शकतील.

Loading RSS Feed