ट्रम्प यांचे जोरदार कॅम्पेन, टीक-टॉक विरोधात फेसबुक-इंस्टाग्रामवर जाहिरात

काही दिवसांपुर्वी भारताने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आता अमेरिका देखील लवकरच चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर बंदी घालण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे टीक-टॉकविरोधात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिरात करत आहेत. या जाहिरातींमध्ये म्हटले आहे की चीनचे हे अ‍ॅप अमेरिकन नागरिकांची हेरगिरी करत आहे. काही दिवसांपुर्वीच ट्रम्प यांनी टीक-टॉकवर बंदी बाबत म्हटले होते.

न्यूयॉर्क टाईम्सचे पत्रकार टेलर लॉरेंज यांनी सर्वात प्रथम ट्रम्प यांच्या टीक-टॉक विरोधीत जाहिरात कॅम्पेनची माहिती फोटो शेअर करत दिली. या कॅम्पेनची जाहिरात आहे, टीक-टॉक तुमची हेरगिरी करत आहे. अमेरिकन नागरिकांना प्रायव्हेसीचा अधिकार आहे.

या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर युजर्सला एक सर्वेक्षण दिसते. या सर्वेक्षणमध्ये टीक-टॉक संबंधी प्रश्न विचारण्यात आले आहे. जसे की, तुम्हाला वाटते का ट्रम्प यांनी अमेरिकेत टीक-टॉकवर बंदी घालावी? याशिवाय आगामी निवडणुकीसाठी डोनेशन देण्याचे देखील आवाहन केले जात आहे.