राजस्थानमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत जनतेला मोजावी लागणे हे दुर्भाग्य – वसुंधरा राजे

राजस्थानमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत संघर्षावर आता राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वादामुळे राज्यातील नागरिकांना किंमत चुकवावी लागणे हे दुर्भाग्य असल्याचे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे. काँग्रेसने भाजपवर आमदारांची खरेदी करत असल्याचा आरोप केला होता. यावर राजे म्हणाल्या की, काँग्रेस आपल्या घरातील लढाईमध्ये भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाला दोष देत आहे.

वसुंधरा राजे यांनी ट्विट करत म्हटले की, हे दुर्भाग्यपूर्ण आहे की काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचे नुकसान आज राजस्थानमधील लोकांना होत आहे. अशा स्थितीमध्ये जेव्हा राज्यात कोरोनामुळे 500 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत व जवळपास 28 हजार कोरोना रुग्ण आहेत.

राजे पुढे म्हणाल्या की, टोळ शेतकऱ्यांच्या पिकांवर वारंवार हल्ला करत आहेत. अशा स्थितीमध्ये जेव्हा आपल्या महिलांविरोधात गुन्हे वाढले आहेत. अशा स्थितीमध्ये जेव्हा वीजेची समस्या मोठा आहे. अशा काळात काँग्रेस, भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाला दोष देण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारसाठी केवळ आणि केवळ जनेतेची हित सर्वकाही असले पाहिजे. कधीतरी जनतेबाबत विचार करा.