कोरोना रुग्णांना औषध-जेवण देण्यासाठी या हॉस्पिटलने केली चक्क रोबॉटची नेमणूक

गुजरातच्या वडोदरा येथील सर सयाजीराव गायकवाड (एसएसजी) हॉस्पिटल सध्या चर्चेत आहे. या हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी खास सोय करत दोन रोबॉट ठेवण्यात आले आहेत. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी या रोबॉटची नेमणूक करण्यात आली आहे. हॉस्पिटलमधील कोरोनाच्या रुग्णांना जेवण आणि औषध देण्याचे काम हे रुग्ण करतात.

न्यूज एजेंसी एएनआयने ट्विटरवर या रोबॉटचे हॉस्पिटलमध्ये काम करतानाचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.

रोबॉट कोरोना रुग्णांना जेवण आणि औषध देत असल्याने आरोग्य कर्मचार्यांचा रुग्णांशी होणारा संपर्क कमी होतो व संसर्गाचा धोका देखील टळतो. त्यामुळे या दोन रोबॉटची येथे नेमणूक करण्यात आले आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, रोबॉट अगदी सहज रुग्णांपर्यंत सुविधा पोहचवत आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.