सौदीचा मोठा निर्णय, हज दरम्यान विना परमिट मक्कामध्ये प्रवेश नाही

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विना परमिटचे पवित्र स्थळ मक्कामध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हजच्या काळात सरकारने हे पाऊल उचलले आहे.

पवित्र शहर मक्कामध्ये सुरक्षा नियंत्रण केंद्र मीना, मुजदलिफा आणि अराफातच्या पवित्र स्थळामध्ये परवानगी नसल्यास प्रवेशास बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे. नियम मोडल्यास 10 हजार सौदी रियाल पर्यंत दंड होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांना कठोर करण्यात आले आहे.

दरम्यान, दरवर्षी 20 लाखांपेक्षा अधिक मुस्लिम हज करतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे स्थिती वेगळी आहे.

Loading RSS Feed