पोलीस दलात होणार 12,538 जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांनी दिली माहिती - Majha Paper

पोलीस दलात होणार 12,538 जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांनी दिली माहिती

कोरोना संकटात एकीकडे कामगार कपात होत असताना, राज्य सरकारने युवकांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे. राज्य सरकार पोलीस दलामध्ये 12,538 पदांसाठी भरती करणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण प्रक्रिया पार पडेल असे त्यांनी सांगितले.

देशमुख यांनी गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या भरती बाबत सूचना दिल्या. देशमुख यांनी ट्विट करत माहिती दिली की, मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते