अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, सैन्य अधिकाऱ्याचा खुलासा

अमरनाथ यात्रेला निशाणा बनविण्याचा कट दहशतवादी रचत असल्याची माहिती जम्मू-काश्मिरच्या सुरक्षा दलांना मिळाली आहे. सैन्याच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली आहे. मात्र त्यांनी स्पष्ट केले की, दरवर्षी होणाऱ्या या यात्रेला कोणत्याही अडथळेशिवाय पुर्ण करण्यासाठी पुर्ण व्यवस्था करण्यात आली आहे व संसाधनांचा वापर करण्यात आला आहे. काल चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे सडेतोड उत्तर आहे. या संदर्भात एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

यंदा 21 जुलैला अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. टू सेक्टरचे कमांडर, ब्रिगेडियर विवेक सिंह ठाकूर यांनी माहिती दिली की, या बाबत गुप्त माहिती आहे की दहशतवादी यात्रेला निशाणा बनवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतील. मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय यात्रा शांततेत पुर्ण होण्यासाठी संपुर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, आम्ही अमरनाथ यात्रा कोणत्याही अडचणीशिवाय शांततेत पुर्ण करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत व सुरक्षा स्थिती नियंत्रणात आहे. राष्ट्रीय महामार्ग 44 च्या एका भागाचा वापर यात्रेकरू करतील. हा भाग थोडा संवेदनशील आहे. यात्रेकरू सोनमर्गपर्यंत जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतील. अमरनाथ गुहेपर्यंत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग चालू राहील.