चीन आता डेपसांगच्या मैदानांवर करत आहे बांधकाम, भारताने घेतला तीव्र आक्षेप

एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावर अनेकदा चर्चा झाली. दोन्ही देशांच्या सैन्यातील असंतोषाच्यामध्ये आता डेपसांग मैदानी भागातील आणि दौलत बेग ओल्डी क्षेत्रातील चिनी सैन्याच्या बांधकाम कारवायांचा मुद्दा भारताने उपस्थित केला आहे. भारत चीनशी राजनैतिक आणि सैन्य पातळीसह अनेक स्तरांवर चर्चा करत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि त्यांच्या चीनी समकक्षसह दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींनी एलएसीवर सैन्याच्या बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा केली आहे.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, सुत्रांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान भारताने चीनला म्हटले आहे की, सैन्य अभ्यासाच्या नावाखाली त्यांनी पुर्व लडाखमध्ये एलएसीवर सैनिकांना मोठ्या प्रमाणात तैनात केले होते व सोबतच मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री तयार केली होती. कमर्शियल सेटेलाईटच्या माध्यमातून याची माहिती घेतली जाऊ शकते. याशिवाय डेपसांगच्या मैदानी भागात आणि डीओबी भागात चीनी बिल्डअप आणि बांधकामाच्या हालचालीवर भारताने आपत्ती दर्शवली आहे.

दरम्यान, डेपसांग मुद्दा मांडण्यापुर्वी भारत गलवान खोऱ्यातील (पीपी – 14), पीपी -15,, हॉट स्प्रिंग्ज, गोगरा आणि फिंगर एरियासह चार बिंदूच्या विस्थापन प्रक्रियेवर चर्चा करत होता. अनेक वेळा चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली होती व चीनी सैन्य मागे हटले होते.