देशात कोरोनाचे थैमान, मागील 24 तासात आढळले 34,884 नवे रुग्ण

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासांमध्ये 34,884 नवीन कोरोना रुग्ण समोर आले असून, यासोबतच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 10,38,716 वर पोहचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचे आतापर्यंत 18,38,716 पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांमध्ये 34,884 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 671 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 26,273 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 6,53,751 लोकांना या व्हायरसवर मात केली आहे. रिकव्हरी रेट हा 62.93 टक्क्यांवर पोहचला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना आता टेस्टिंगचा वेग देखील वाढविण्यात आला आहे. 17 जुलैला 3,69,024 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. हा एका दिवसातील टेस्टिंगचा सर्वाधिक आकडा आहे. 17 जुलैपर्यंत 1,34,33,742 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील संक्रमित निघण्याचा दर 9.66 टक्के झाला आहे.

Loading RSS Feed