यूएईमध्ये सुरू झाले कोरोना प्रतिबंधक लसीचे जगातील पहिले फेज-3 क्लिनिकल ट्रायल

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. दररोज कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. यातच आता यूएईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीच्या जगातील पहिल्या फेज-3 क्लिनिकल ट्रायलची सुरूवात झाली आहे. अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीवर काम सुरू आहे. यूएईमध्ये कोव्हिड-19 इनएक्विटेड लसीसाठी जगातील पहिल्या फेज-3 ट्रायलची सुरूवात झाली आहे. चीनची लस निर्माता कंपनी सिनोफार्म आणि दुबईतील जी42 हेल्थकेअरच्या भागीदारीमध्ये या ट्रायलची सुरूवात झाली आहे.

ग्लोबल टाईम्सनुसार, यूएईचे नागरिक आणि प्रवाशांसह 15 हजार नोंदणीकृत स्वयंसेवकांच्या पहिल्या समूहाला अबूधाबीच्या एका आरोग्य केंद्रात शेख खलीफा मेडिकल सिटीमध्ये लस देण्यात आली. जी42 द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, यूएई आरोग्य विभागाचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन मोहम्मद अल हमीद लसीच्या ट्रायलमध्ये भाग घेणाऱ्या सुरूवातीच्या लोकांमध्ये सहभागी आहेत.

कंपनीच्या प्रमुखासह 1000 पेक्षा अधिक सिनोफार्म कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने लस देण्यात आली आहे. या लसीचे पहिल्या दोन टप्प्यातील ट्रायलचे परिणाम देखील दिलासादायक होते.