सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची गरज नाही – अनिल देशमुख

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. अनेक कलाकार, नेत्यांसह सुशांतची गर्लफ्रेंड रियाने देखील या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी सीबीआय तपास करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपास करण्याची गरज नाही. मुंबई पोलीस या प्रकरणात तपास करण्यास सक्षम आहेत.

देशमुख म्हणाले की, माझ्याकडे देखील कॅम्पेनचे अनेक ट्विट आले. मात्र मला वाटते की सीबीआय तपासाची काही आवश्यकता नाही. मुंबई पोलीस हे प्रकरण सोडवेल. पोलीस प्रत्येक अँगलने तपास करत आहे. चौकशी पुर्ण होताच याच्या अंतिम रिपोर्टची सविस्तर माहिती देण्यात येईल.

रिया चक्रवर्तीच्या आधी बिहारचे माजी खासदार पप्पू यादव, अभिनेता शेखर सुमन, रुपा गांगुली आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह अनेकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.