अजय देवगणने शेअर केला ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’मधील सोनाक्षीचा दमदार लूक


‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटाद्वारे लवकरच बॉलीवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणने नुकताच या चित्रपटातील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लुक रिलीज केला असून हा चित्रपट येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता हा चित्रपट डिझ्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी चित्रपटातील अजय देवगण आणि संजय दत्त यांचा लूक यापूर्वी रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता सोनाक्षी सिन्हाचा लूक समोर आला आहे. अजय देवगणने सोनाक्षी सिन्हाचा लूक ट्विटरवर शेअर केला आहे. अजय देवगणने ट्विटमध्ये लिहिले आहे की चित्रपटात सोनाक्षी सिन्हा सुंदरबेन जेठा मधरपर्या ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिने 299 महिलांसह 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान भुज एअरपोर्ट दरम्यान इंडियन एअर फोर्सची मदत केली होती. या भूमिकेसाठी सोनाक्षीचा लूक अत्यंत योग्य वाटत आहे. या चित्रपटात संजय दत्त सह नोरा फतेही झळकणार आहे. या चित्रपटातील नोराची भूमिका पूर्वी परिणीति चोप्रा साकारणार होती.