… म्हणून स्कॉच ब्राइटच्या पाकिटावरून हटवला जाणार महिलेचा लोगो

काही दिवसांपुर्वी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने फेअर अँड लव्हलीने या आपल्या उत्पादनाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता स्कॉच ब्राइट देखील आपला लोगो बदलणार आहे. तुम्ही जर लक्ष दिले असेल तर तुम्हाला स्कॉच ब्राइटच्या पाकिटावर टिकली लावलेल्या महिलेचा लोगो दिसला असेल. आता कंपनी हा टिकली लावलेल्या महिलेचा लोगा बदलणार आहे. स्कॉच ब्राइट 3एम चे मार्केटिंग प्रमुख अतूल माथूर यांनी ही माहिती दिली आहे.

कार्तिक श्रीनिवासन नावाच्या व्यक्तिने स्कॉच ब्राइटच्या लोकावर प्रश्न उपस्थित करत म्हटले होते की, स्कॉच ब्राइटवर टिकली लावलेल्या महिलेचा फोटो या गोष्टीचा संदेश देत आहे की घरातील जेवढीही काम आहेत, जसे की झाडू, फरशी पुसणे, भांडी घासणे, साफ सफाई हे केवळ महिलांचे काम आहे का ? आमचे हे अजिबात म्हणणे नाही की हे केवळ महिलांचे काम आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे की समाजात आपल्याद्वारे चुकीचा संदेश पसरू नये.

यावर उत्तर देताना कंपनीचे मार्केटिंग प्रमुख अतुल माथूर यांनी म्हटले की, कार्तिक मी तुम्हाला वचन देतो की लवकरच स्कॉच ब्राइटच्या पाकिटावर या प्रकारचा लोगो देणार नाही. आम्ही स्कॉच ब्राइटद्वारे कोणताही चुकीचा संदेश समाजात देऊ इच्छित नाही. त्यांनी ‘घर सबका तो काम भी सभी का’ या जुन्या जाहिरातीची आठवण करून देत लिंक देखील शेअर केली.