जगभरात एक कोटी 39 लाख, तर भारतात 10 लाखांच्या पार कोरोनाबाधित


नवी दिल्ली – जगभरात कोरोना या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले असून जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटी 39 लाखांहून अधिक झाला आहे. मागील 24 तासात जगभरात 2.47 लाख नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 5,714 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कहर भारतात देखील वाढला असून भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासात 32 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद भारतात झाली आहे.


यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण जगभरातील एक कोटी 39 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाख 92 हजारांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे जगभरातील 82 लाखांहून अधिक लोकांना कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

वर्ल्डोर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात चौथ्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाचे 10,05,637 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 25,609 बळी गेले आहेत. भारतात सध्या 3,43,426 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 6,36,602 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 32 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत 36,93,700 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 1,41,095 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 20,14,738 कोरोनाबाधित आहेत तर 76,822 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर यूकेत 45,119 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तेथील कोरोनाबाधितांची संख्या 2,92,552 एवढी आहे.

देशकोरोनाबाधितमृत्यु
अमेरिका36,93,7001,41,095
ब्राझिल20,14,73876,822
भारत10,05,63725,609
रशिया7,52,79711,937
पेरू3,41,58612,615
दक्षिण आफ्रिका3,24,2214,669
चिली3,23,6987,290
मॅक्सिको3,17,63536,906
स्पेन3,05,93528,416
यूके2,92,55245,119

अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण,मॅक्सिको, पाकिस्तान, टर्की, साऊथ अरब, साउथ आफ्रिका आणि जर्मनी हे 16 देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखांहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे.