21 लाखांची नवीन ‘बीएमडब्ल्यू एस1000 एक्सआर’ भारतात लाँच

बीएमडब्ल्यू कंपनीने भारतीय बाजारात आपली नवीन बीएमडब्ल्यू एस1000 एक्सआर एडव्हेंचर स्पोर्ट्स-टूरर बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत 20.90 लाख रुपये आहे. भारतीय बाजारात ही बाईक केवळ प्रो व्हेरिएंटमध्ये मिळेल. ही बाईक कम्पलिट बिल्ट यूनिट स्वरूपात येईल व डिलरशीपच्या माध्यमातून खरेदी करता येईल.

नवीन बीएमडब्ल्यू एस100 एक्सआर मध्ये बीएस6-कम्प्लायंट 999सीसी, इन लाइन  4-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 11,000rpm वर 165bhp पॉवर आणि 9,250rpm वर 114Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड गियरबॉक्सने सुसज्ज आहे. बाइकमध्ये स्लिपर क्लच आणि इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल स्टँडर्ड मिळेल. कंपनीचा दावा आहे की बीएमडब्ल्यू एस1000 एक्सआर केवळ 3.3 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडू शकते. बाईकचा टॉप स्पीड ताशी 200 किमी आहे.

नवीन एस 1000 एक्सआर बाईकमध्ये रेन, रोड, डायनॅमिक आणि डायनॅमिक प्रो हे चार रायडिंग मोड देण्यात आले आहे. डायनॅमिक प्रो मोडमध्ये राइडर ट्रॅक्शन कंट्रोल, थ्रॉटल रिस्पॉन्स, एबीएस मिळेल. बाईकमध्ये 6.5-इंच फुल-कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने बाईकचे सर्व मोड आणि सेटिंग्सला ऑपरेट करता येईल. बाईकमध्ये DTC, हिल स्टार्ट कंट्रोल आणि बीएमडब्ल्यू इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन एजस्टमेंट सिस्टम सारखे फीचर्स आहेत.

बीएमडब्ल्यू एस 1000 एक्सआरचे वजन (कर्ब वेट) 226 किलो असून, फ्यूल टँकची क्षमता 20 लीटर आहे. बाईक आइस ग्रे आणि रेसिंग रेड या दोन रंगात उपलब्ध आहे.