व्हिडीओ : अपघातात हत्तीणीने गमवला होता पाय, असा बसवला नवीन

सोशल मीडियावर एका हत्तीणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या हत्तीणीने अपघातात आपला आपला उजवा पाय गमवला होता. मात्र आता या हत्तीणीला नवीन आर्टिफिशियल पाय बसविण्यात आल्याने, ती पुन्हा एकदा चालू शकणार आहे.

रोहन दुआ या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ थायलंडचा आहे. या हत्तीणीचे नाव मोशा असून, जवळपास 7 महिन्यांपुर्वी तिने लँडमाइनमधील दुर्घटनेत आपला एक पाय गमवला होता. फ्रेंड्स ऑफ द एशियन एलिफंट फाउंडेशनने या हत्तीणीवर उपचार केले व तिला नवीन पाय बसवला. या आर्टिफिशियल पायाने चालण्यात काहीही अडचण येत नाही.

ही संस्था घटनेत दुखापतग्रस्त झालेल्या हत्तींसाठी आर्टिफिशियल पाय बनवते. यात संस्था नवनवीन तंत्रज्ञानाचा देखील समावेश करत आहे. मोशा ही पहिली हत्तीण आहे, जिच्यावर हा यशस्वी प्रयोग करण्यात आला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा आर्टिफिशियल पाय तयार करणाऱ्या डॉक्टर्सचे नेटकरी कौतुक करत आहेत.