व्हिडीओ : 5व्या मजल्यावरून खाली पडला चिमुकला, शेजाऱ्याने झेलून वाचवले प्राण

चीनच्या जिआंगसू येथील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. येथील हुइआन शहरातील जुयई काउंटीमध्ये एक लहान मुलगा 5व्या मजल्यावरील खिडकीला लटकला. मात्र शेजाऱ्याच्या समजूतदारपणामुळे त्याचे प्राण वाचले. 2 वर्षांच्या मुलाने स्वतःला बेडरूममध्ये लॉक केले होते. यानंतर तो स्टूलच्या मदतीने बेडरूमच्या खिडकीपर्यंत पोहचला आणि बाहेर लावलेल्या एअर कंडिशनर यूनिटला पकडून लटकला.

शेजारी ली देहाई यांनी मुलाला बघितल्यावर त्वरित त्याला वाचविण्यासाठी हालचाल केली. त्यांनी सांगितले की, जेव्हा मी त्याला लटकताना पाहिल्यावर लगेच बेडशीट घेऊन आलो व चार लोकांसह त्याला झेलण्यासाठी उभा राहिलो. यानंतर तेथे असलेल्या काचेला जाखण्यासाठी आणखी एक जाड बेडशीट टाकली जेणेकरून त्यावर पडल्यास त्याला इजा होणार नाही.

मुलाची पकड सैल झाल्यानंतर तो खाली कोसळला. यावेळी ली देहाई यांनी या मुलाला झेलले. यानंतर त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याला कोणतीही दुखापत झाली नसून, तो सुरक्षित आहे.

या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी ली यांचा शोध घेत त्यांना सन्मानित देखील केले.