केतकी चितळेची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट, संतापले नेटकरी


दररोज काहींना काही उलट सूलट पोस्ट केल्यामुळे केतकी चितळे वादाच्या भोव-यात अडकत आहे. तिच्याकडून वारंवार भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपले मत माडताना ती नव्या वादाला तोंड फोडत आहे. त्यातच आता तिने पुन्हा एकदा नवी पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

त्यातून तिने दारू पिण्याच्या मुद्द्यावरून टीका करणा-यांना उत्तर दिले आहे. केतकीने या पोस्टमधून आरोप आणि सत्य असे दोन फोटो शेअर केले असून एका बाजूला तिचा दारू पितानाचा व्हायरल होत असलेला फोटो तर दुसऱ्या बाजूला दारूतून सरकारला मिळणारा कर याबाबतची बातमी असलेला फोटो शेअर केला आहे. दरम्यान, केतकी चितळेला आता या पोस्टवरुन आणखीनच ट्रोल केले जाऊ लागले आहे.

केतकी चितळेने या आधी सोशल मीडियावर महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. शिवप्रेमींनी केतकीच्या या पोस्टवर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. केतकीला नेटीझन्स सध्या खडेबोल सुनावत जबरदस्त ट्रोल करत आहेत. अशातच केतकी चितळेने पुन्हा एक पोस्ट लिहिली असून त्यात तिने शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

त्या पोस्टमध्ये केतकीने शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळते काय तर लोकांचे पर्सनल नम्बर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे !, असे म्हटले होते. त्याचबरोबर तिला आलेले मेसेजचा स्क्रीनशॉटही तिने शेअर केला होता.

शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नम्बर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे!

Posted by Ketaki Chitale on Monday, July 13, 2020