अशीच परिस्थिती राहिली तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10 ऑगस्टपर्यंत 20 लाख होईल


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने आज 10 लाखांचा टप्पा पार केला असून, देशासाठी ही बाब चिंताजनक असल्याचे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 10 ऑगस्टपर्यंत देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 10 लाखांचा टप्पा ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या पार झाला आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित असतील, असे त्यांनी म्हटले आहे. या महामारीला रोखण्यासाठी ठोस, नियोजित पावले सरकारने उचलायला हवीत, असेही त्यांनी म्हटले आहे.