अमित शाहांचा सेक्रेटरी बनून गडकरींना केला फोन, ठगाला अटक - Majha Paper

अमित शाहांचा सेक्रेटरी बनून गडकरींना केला फोन, ठगाला अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा बनावट खाजगी सेक्रेटरी बनून आयएएस अधिकारी आणि लोकांना फसवणाऱ्या एका आरोपीला इंदुर पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी स्वतःला अमित शाहांचा सेक्रेटरी सांगून अधिकाऱ्यांकडून काम करून घेत असे. मध्य प्रदेशमधील दोन आरटीओच्या बदल्यांसाठी तर या ठगाने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना देखील फोन केला. यानंतर दिल्ली क्राईम ब्रँचने अखेर त्याला अटक केले. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

एएसपी क्राईम ब्रँच राजेश दंडोतिया यांच्यानुसार, पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव अभिषेक द्विवेदी आहे. तो मध्य प्रदेशच्या रीवा येथील रहिवासी आहे. अभिषेकचा शोध दिल्ली पोलीस देखील घेत होते.

या ठगाने मध्य प्रदेशच्या दोन आरटीओच्या बदलीसाठी नितीन गडकरी यांना देखील फोन केला होता. ही माहिती दिल्ली पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर, दिल्ली क्राईम ब्रँचने याचा तपास सुरू केला. अखेर पोलिसांनी त्याला इंदूरमधून अटक केले.

अभिषेकवर अनके गुन्हे दाखल असून, 2-3 प्रकरणात तो वाँटेड देखील आहे.