झूमला टक्कर देण्यासाठी फेसबुकने युजर्ससाठी आणले हे खास फीचर

फेसबुकने व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म झूमला टक्कर देण्यासाठी एक खास फीचर आणले आहे. फेसबुकने मेसेंजरमध्ये एक नवीन फीचर दिले आहे, जे झूम सारखेच आहे. आता मेसेंजरमध्ये देखील युजर्सला स्क्रिन शेअर करता येणार आहे. हे फीचर अँड्राईड आणि आयओएस मेसेंजर अ‍ॅपमध्ये मिळणार आहे. या फीचर अंतर्गत ग्रुप व्हिडीओ कॉल किंवा वन ऑन वन व्हिडीओ कॉलिंग दरम्यान एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करता येईल

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच क्रमात फेसबुकने मेसेंजरमध्ये ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सेवा सुरू केली होती. नवीन फीचर 8 लोकांसोबत व्हिडीओ कॉलिंग दरम्यान वापरता येईल.

स्क्रीन शेअरिंगचे हे फीचर केवळ मोबाईल अ‍ॅपमध्येच नाही तर मेसेंजर रूम वेबमध्ये देखील वापरता येईल. म्हणजेच तुम्ही कॉम्प्यूटर स्क्रीन देखील शेअर करू शकता.